कोरोना विरोधात लढण्यासाठी ४ टप्प्यांत विभागणी – मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे

मुंबई – आरोग्य सेवा, पोलीस, इतर कर्मचाऱ्यांसोबतच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद, महसूल खात्याचे अधिकारी, जे जे या युद्धात युद्धभूमीवर उतरून अहोरात्र मेहनत घेताहेत त्यांचे आभार मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे यांनी मानले आहेत. ते फेसबूकद्वारे जनतेशी संवाद साधत होते. महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्र सरकारने चाचणीसाठी ४ टप्पे तयार केले आहेत. काय आहे चार टप्प्यांत पहिल्या टप्प्यांत सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणं असलेल्या रुग्णांनी क्युअर रुग्णालयात जाऊन स्वत:ची तपासणी करून घ्यावी. तिथे तपासणी झाल्यावर रुग्णाला पुढील मार्गदर्शन देणार आहे. सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांसाठी दुसऱ्या टप्पा असणार आहे. म्हणजे सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर वेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येतील. थोडी तीव्र लक्षण असलेल्या रुग्णांसाठी वेगळ्या रुग्णालयाची सोय करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त मधुमेह, उच्चरक्तदाब आणि इतर आजार आहेत त्यांच्यावर वेगळ्या रुग्णालयाची सोय करण्यात आली आहे. क्युअर रुग्णालयात रुग्णाला कोणत्या रुग्णालयात पाठवयाचे यावर मार्गदर्शन करण्यात येईल.पीपीई किट्स प्रमाणित करावं लागतं, वैद्यकीय उपकरणांची प्रमाणित असावं लागतं, त्यामुळे त्यांच्या खरेदीसाठी वेळ लागतो, ज्यावेळेस हे उपकरणं प्रमाणित होतील तेव्हा लगेच महाराष्ट्रात हे उपकरण येईल कोविड चाचण्यांची क्षमता वाढवली महाराष्ट्रातील एकूण १०१८ रुग्णांपैकी ६१० रुग्णांना गंभीर लक्षणं नाहीत, तर २६ रुग्णांना गंभीर लक्षणं आहेत, ८० रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झालाय.

Covidyoddha@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधून युद्धात सहभागी व्हावं सैन्यात आरोग्य विभागात काम केलेल्या निवृत्त सैन्यांनी पुढे यावे निवृत्त परिचारिका, वॉर्डबॉय, प्रशिक्षित परिचारिका ज्यांना नोकरी मिळालेली नाही, त्यांनीही पुढाकार घेऊन या युद्धात सहभागीव व्हावं कोव्हिड हॉस्पिटलची मागणी, सौम्य लक्षणांसाठी एक हॉस्पिटल, लक्षणांची तीव्रता असणाऱ्यांसाठी दुसरं हॉस्पिटल आणि कोरोनासोबत इतर आजार असणाऱ्या रुग्णांसाठी तिसरं हॉस्पिटल असणार आहे. आरोग्य सेवेचे ४ विभाग करण्यात आले. क्युअर क्लिनिकमध्ये मार्गदर्शन केलं जाईल सर्दी, खोकला आणि ताप ज्यांना लक्षणं असतील त्यांनी क्युअर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करावी अमेरिकेसारखा बलाढ्य देशही भारताकडे मदत मागतोय पीपीई किट्स, एन ९५ चा जगभरात तुटवडा व्हेंटिलेटरची निर्मिती करण्यास कंपन्यांनी सुरुवात केलीय जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापर,

कोरोना देशातून हद्दपार झाल्यानंतरही मास्कची सवय मोडू नका नव्या वेंटीलेटरची चाचणी सुरू वैद्यकीय उपकरणांचा जगभर तुटवडा सहा लाख लोकांना राज्यसरकारकडून अन्न वाटप दिवसभरात तीनवेळच्या जेवणाची सोय करण्यात येतेय केंद्राने दिलेल्या योजनेत फक्त तांदूळ माणुसकीच्या धर्मातून लढाई जिंकूया दक्षतेने सामना केला तर आपणही बाहेर पडू वुहानमधील निर्बंध हटवले ही दिलासादायक माहिती हे ही दिवस जातील, संयम बाळगा कोरोनानंतर अर्थव्यवस्थेशी लढायचं आहे. लोकांनी घरात बसून व्यायाम करावा, सकस आहार घ्यावा जनता तणावमुक्त कशी राहील, असे कार्यक्रम वाहिन्यांनी दाखवावे चार आठवड्यात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांत वाढ व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पहिल्यांदा बैठक घेतली, सर्व मंत्ऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवल्याने त्यांचे आभार

Latest News