केंद्र सरकारकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींची मदत

महाराष्ट्रासह अन्य दुष्काळग्रस्त राज्यांना 7 हजार 214 कोटींच्या मदतनिधीस केंद्र सरकारने मंगळवारी मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह अन्य दुष्काळग्रस्त राज्यांना 7 हजार 214 कोटींच्या मदतनिधीस केंद्र सरकारने मंगळवारी मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय कमिटीची बैठक झाली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या राज्यांना 7,214.03 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पदुचेरी, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. यात दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक जास्त मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्राला जवळपास 4 हजार 714 कोटींची मदत जाहीर केली आहे.