देशात घुरगुती गॅस दरवाढ.

पुणे – लॉकडाऊनच्या काळात देशधडीला लागलेल्या सामान्य नागरिकांचा खिसा आता आणखी रिकामी होणार आहे. कारण देशात घुरगुती गॅसचीही भाववाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात साडेअकरा रुपये दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईत विना अनुदानित सिलिंडरची किंमत 11.50 रुपयांनी वाढ झाली आहे. दर वाढीपूर्वी याची किंमत 579 होती. ती आता 590.50 रुपये झाली आहे. तर कोलकातामध्ये 584.50 वरून 616 रुपये आणि चेन्नईमध्ये 569.50 वरून 606.50 रुपये झाले आहेत. तर, पुण्यात पूर्वी विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर 582 रुपये होता, आता तो 593.50 वर पोहचला आहे. अहमदनगरला 593 वरुन 604.50 रुपयांवर गेला. तर 19 किलो ग्रॅमचा सिलेंडर 1055 वरुन 1165 रुपयांवर गेला आहे‌. प्रत्येक शहरातील स्थानिक कर पद्धती आणि वाहतूक यानुसार सिलेंडरची किंमत काही फरकाने कमी-अधिक असू शकते. दरम्यान, कालच इंधर दरात दोन रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे पेट्रोल 78.31 आणि डिझेल 68.21 रुपयांवर गेले आहे. पेट्रोलवरील 26% आणि डिझेलवरील 24% ‘व्हॅट’शिवाय राज्य सरकार इंधनांवर उपकर (सेस) आकारते. सरकारने पेट्रोलवरील उपकर 8.12 रुपयांवरुन 10.12 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढवण्याची अधिसूचना जारी केली. तर डिझेलवरील उपकर प्रतिलिटर एक रुपयाऐवजी तीन रुपयापर्यंत वाढवला आहे.