रायगड जिल्ह्याला 100 कोटीची मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


अलिबाग: दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. या चक्रीवादळात अनेक नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. या पाहणी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यासाठी तात्काळ १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.