दहावी-बारावीचा निकाल कधी?

मुंबई – कोरोना व्हायरसच्या (coronavirus) प्रादुर्भावाचा फटका शिक्षण क्षेत्रालाही बसला आहे. दहावीचा पेपर सुरू असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आता दहावी बारावीचे निकाल केव्हा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्या‌विषयी सोशल मीडियावर उलटसुलट चर्चाही सुरू आहेत. मात्र या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा करण्यात आलं आहे.

‘सोशल मीडियावर राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या निकालांबाबत देण्यात येत असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या निकालाबाबत राज्य मंडळाकडून अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात येईल,’ असा खुलासा शकुंतला काळे यांनी केला आहे.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यालाच अनलॉक १ म्हटलं गेल्याने या टप्प्यात अनेक गोष्टी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातच HRD मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 3 जून रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील शाळा आणि महाविद्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. कोरोनाच्या महासाथीत 16 मार्चपासून देशातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ऑगस्ट 2020 नंतर शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तब्बल 33 कोटी विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. पालक व शिक्षकांसोबत झालेल्या चर्चेनंतर एचआरडी मंत्री रमेश निशंक पोखरिया यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यातही 15 ऑगस्टनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचा निकाल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

Latest News