पुण्यातील सुनेनं बॉयफ्रेंडसोबत मिळून सासरी केली 1.75 कोटींची चोरी

पुणे : महाराष्ट्रातील पुणे येथे चोरीचा एक विचित्र प्रकार उघडकीस आला. एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत एक मोठा कट रचला, अन् आपल्या सासरीच चोरी घडवून आणली. या महिलेने प्रियकराच्या मदतीनं दागिने आणि रोकडसह 1.74 कोटी रुपये लंपास केले. चोरीचा कट रचतानाा त्यांनी तिजोरीच्या बनावट चाव्या तयार केल्या आणि घरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरा दुसर्‍या बाजूस वळवला. मात्र तरी सीसीटीव्ही कॅमेर्‍यानं महिलेची पोलखोल केली.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या महिलेला अटक केली आहे, तर तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.

हे प्रकरण पुण्यातील बीवेवाडी येथी आहे. अक्षय दिलीप भंडारी नावाच्या व्यक्तीनं घरात दागिन्यांसह रोख रक्कम चोरी केल्याचा गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितले. तक्रारीत त्यानं सांगितले की लोकेश सोसायटीच्या गायत्री अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर एकमध्ये तो आपल्या कुटूंबासह राहतो. सुमारे चार वर्षांपूर्वी त्याच्या लहान भावाचे मृणालशी लग्न झालं होतं. अक्षय मसाल्यांचा व्यवसाय करतो, त्यामुळं घरातच दागिने आणि रोकड ठेवली होती.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं केली पोलखोल

अक्षयने सांगितले की मृणालने आपल्या प्रियकरसोबत घरातून दागिने व रोकड चोरली. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं हे प्रकरण उघडकीस आले. सीसीटीव्हीमध्ये एका महिलेचा हात दिसत आहे जी कॅमेरा फिरवत होती, मृणालचं असल्याचं दिसून आले. दरम्यान कुटुंबाची बदनामी होण्याच्या भीतीने त्याने मृणालला समजावून सांगितले आणि पोलिसांत तक्रार दिली नाही. घरच्यांनी मृणालचा प्रियकर बुबाने याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. इथं मृणालच्या वागणूकीत कोणताही बदल झाला नाही. शेवटी कुटुंबीयांना पोलिसांत तक्रार करावी लागली.

प्रियकरासोबत परदेशात जाण्याचा होता प्लॅन

एसपी कुमार घाडके म्हणाले की, बुबाने नावाच्या व्यक्तीशी मृणालचे 2013 पासून संबंध चालू होते. तिच्या संमतीशिवाय कुटुंबीयांनी 2016मध्ये तिचा विवाह अमर भंडारशी विवाह केला. मृणालने पोलिसांना सांगितले की ती बुबानेला ती2013 पासून ओळखत होती. चोरी केल्यानंतर दोघेही देश सोडून परदेशात पळून जाऊन तेथे लग्न करण्याचा त्यांचा प्लॅन होता. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही बुबानेवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस सध्या बुबानेचा शोध घेत आहेत.