पुण्यात नव्या आदेशानुसार

पुणे :  राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून आता बाहेर पडण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई आणि पुणे शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊन नियम आणि अटीसह प्रशासनाने परवानगी दिली आहे.

पुणे शहरासाठी प्रशासनाने एक नियमावली जाहीर केली आहे.  पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबद्दल 2 जून रोजी आदेश काढला आहे. त्यानुसार शहरात  तीन टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सुचनेनुसार, शासकीय आणि खासगी कार्यालयात 10 टक्के कर्मचारी क्षमतेसह उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीसही परवानगी देण्यात आली आहे.  त्यामुळे पुण्यात आजपासून खासगी कार्यालय सुरू झाली आहे. तसंच 50  लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकता येणार आहे. तर अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी 20 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुणे शहरासाठी या आहे परवानगी

1.खाजगी कार्यालये  (10 टक्के मनुष्यबळासह)

2. लग्न समारंभ (50 व्यक्तींसह)

3. अंत्यविधी कार्यक्रम (20 व्यक्ती)

4. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे व्यवसाय

5. माहिती व तंत्रज्ञान विषयक हार्डवेअरची निर्मिती व पॅकेजिंगकरिता लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती

6. दालमिळ, अन्न प्रक्रिया उद्योग

7. घरकाम करणाऱ्या व्यक्ती  

8. ज्येष्ठ नागरिकांचे मदत करणारे कर्मचारी

9. वर्तमानपत्रे वितरण व स्टॉल  

10. वित्तीय क्षेत्र  

11. घरपोच सेवा (ई-कॉमर्स घरपोच वस्तूंचे वितरण)

12. माहिती तंत्रज्ञान

13.  फूड डिलेव्हरी

14. बांधकाम  करण्यास परवानगी

15. मेट्रो रेल्वेचे काम

16. धोकादायक इमारती पाडण्याची कारवाई

वरील कामांना परवानगी देण्यात आली असून मात्र प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत सुरू राहतील. तसंच दुकानदारांना मास्क, सेनिटायझर वापरणे बंधनकारक असणार आहे.

हे बंदच राहणार:  – शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस

 – थिएटर्स, व्यायाम शाळा, पोहण्याचे तलाव, नाट्यगृहे

– राजकीय, धार्मिक, क्रीडा, कार्यक्रमांना परवानगी नाही

– सलून, ब्युटी पार्लर

या मार्गावर सुरू राहणार दुकानं

–  जंगली महाराज रोड : संचेती चौक – झाशी राणी चौक – डेक्कन जिमखाना – संभाजी पुतळा – खंडोजी बाबा चौक

– एफसी़रोड : खंडोजीबाबा चौक – गुडलक चौक – वैशाली हॉटेल – फर्ग्युसन कॉलेज – संत ज्ञानेश्वर पादुका चौक – शिवाजीनगर पोलीस स्टेशन

– गणेशखिंड रोड : शिमला चौक – म्हसोबा चौक – सेट्रल मॉल – शासकीय तंत्रनिकेतन – विद्यापीठ चौक राजभवन – इंदिरा गांधी

– शिवाजी रस्ता पुणे मनपा डेंगळे पुल – शनिवारवाडा ते जेथे चौक

–  बाजीराव रस्ता : पुरम चौक – माडीवाले कॉलनी – शनिवार चौक – विश्रामबागवाडा – शनिवारवाडा

–  हडपसर : सोलापूर रोड – मगरपट्टा चौक ते गाडीतळ, गाडीतळ ते लक्ष्मी कॉलनी चौक ते शेवाळवाडी टोलनाका ते पुणे शहर हद्द

– गाडीतळ ते फुरसुंगी सासवड रोडने पुणे शहर हद्द

– सातारा रोड : जेधे चौक – लक्ष्मीनारायण थिएटर, सिटी प्राईड, विवेकानंद पुतळा, धनकवडी फ्लाय ओव्हर ते कात्रज चौक, कात्रज चौक ते सातारा रोडने पुणे शहर हद्द

– नगर रोड : येरवडा पर्णकुटी, गुंजन चौक, विमाननगर, वडगावशेरी, खराडी बायपास चौक ते वाघोली, तैलाची मोरी ते पुणे शहर

– एअरपोर्ट रोड : गुंजन चौक- गोल्फ क्लब रोड, येरवडा पोस्ट ऑफिस-नागपूर चाळ-जेल रोड पोलीस चौकी, संजय पार्क – 509 चौक – एअरपोर्ट

– सिंहगड रोड : दांडेकर पुल – पानमळा – रोहन कृतिका लगत, नाकोडा नगर – राजाराम पुल – विठ्ठलवाडी , संतोष हॉल – आनंदनगर, माणिकबाग – वडगाव धायरी उड्डाणपुल, धायरी फाटा -धायरी शेवटचा बसस्टॉप

– पौड रोड : खंडोजीबाबा चौक – स्वांतत्र्य चौक – नळ स्टॉप – कर्वेरस्ता फ्लायओव्हर- आनंदनगर – शास्त्री नगर, कोथरूड बस डेपो -चांदणी चौक

Latest News