येरवडा कारागृहातून 2 कैदी पळून गेले

येरवडा भागात सुरु केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून गंभीर गुन्हे दाखल असलेले दोन कैदी पळून गेले. ही घटना आज (दि.13) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांकडून या फरार कैद्यांचा शोध घेतला जात आहे.

हर्षद सय्यद (20, रा. कासारवाडी) आणि आकाश बाबूराव पवार (26) हे दोन्ही कैदी पहाटेच्या वेळी तात्पुरत्या कारागृहातून पळून गेले. हर्षद सय्यद हा दरोड्याप्रकरणी तर आकाश पवार हा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कैदेत होता.

कैदी पळून गेल्याचे लक्षात येताच कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.

Latest News