भारत-चीनवरील परिस्थिती नियंत्रणात – लष्करप्रमुख मुकुंद नरवणे

नवी दिल्ली – भारत-चीनमधील सीमेवरील वातावरण बिघडत जात आहेत. मात्र हे चिघळलेलं वातावरण आता नियंत्रणात आले असल्याचं लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी सांगितले. देहरादून येथील सैन्य अकादमीमध्ये शनिवारी पासिंग आऊट परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर ते बोलत होते.
“चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमा पूर्णपणे नियंत्रणात आहेत, याचं मी आश्वासन देतो. तसंच चीनसोबत आमची कमांडर स्तरावरील बैठकीचं सत्र सुरू आहे,” असं मुकुंद नरवणे म्हणाले.

“याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चां सुरू आहेत. त्याद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरही समान रँकच्या कमांडर्ससोबत चर्चा सुरू आहेत. त्याद्वारे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. नेपाळसोबत सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. “आमचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये उत्तम संबंध आहेत. दोन्ही देशांच्या लोकांना एकत्र जोडण्यासाठी आमच्याकडे चांगल्या व्यक्ती आहे. आमचे संबंध कायम उत्तम होते आणि भविष्यातही राहतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळी पावणे सातच्या सुमारास सर्व कॅडेट्स आयएमएच्या मैदानावर पोहोचले होते. त्यानंतर परेड सुरू झाली. सर्वप्रथम डेप्युटी कमांडेंट यांनी परेडला सलामी दिली. त्यानंतर कमांडेंट लेफ्टनंट जनरल जयविर सिंह नेगी यांनी परेडची सलामी स्वीकारली. त्यानंतर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी परेडचं निरिक्षण केलं. भारताच्या ३३३ कॅडेट्सनं आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. यासोबतच ९० परदेशी कॅडेट्सही यात सहभागी झाले होते. त्यांनीदेखील आयएमएमधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं.

Latest News