मुंबईची लाईफलाईन आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच

मुंबई – गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन ‘लोकल’ आजपासून पुन्हा रुळावर आली आहे. मात्र केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. मुंबईतील लोकल सुरु व्हावी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पश्चिम रेल्वे मार्गावर १२० तर मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर २०० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. या लोकलचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे म्हणजेच पोलीस, डॉक्टर, नर्स, पालिकेचे सफाई कर्मचारी, उर्वरित पालिका कर्मचारी आणि पत्रकार या काही ठराविक लोकांना करता येणार नाही. सर्वसामान्यांना लोकलचा वापर करता येणार नाही.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १.२५ लाख अत्यावश्यक कर्मचारी या लोकलमधून प्रवास करण्याची शक्यता आहे. या प्रवाशांनी तिकीट खिडकीत शासकीय ओळखपत्र दाखवल्यास त्यांना तिकीट मिळू शकते. तसेच पासधारक तिकिटांची वैधता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आयडी कार्डच्या माध्यमातून स्थानकांवर प्रवेश दिला जाईल. यानंतर त्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील. महत्त्वाचे म्हणजे जे कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ आहेत त्यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

Latest News