पुणे शहरात आता 73 प्रतिबंधित क्षेत्र नियम कडक केले जाणार

पुणे – मागील पंधरा दिवसांत नव्याने सापडलेले भाग महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर दि. 1 जून रोजी जाहीर केलेल्या 69 प्रतिबंधित भागातील 24 भाग वगळण्यात आले असून नव्याने 28 भाग प्रतिबंधित क्षेत्रात वाढवण्यात आले आहेत. मात्र, यावेळी हे भाग शहराच्या सर्व ठिकाणचे असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मागील 15 दिवसांत सापडलेल्या एकूण रूग्णांमध्ये सुमारे 49 टक्के रुग्ण हे जुन्या प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या क्षेत्रांमध्ये आता कोथरूड, सिंहगड रस्ता, औंध या सुरुवातीला सर्वांत कमी रुग्णसंख्या असलेल्या परिसराचाही समावेश आहे. या भागात सुरक्षेचे नियम कडक केले जाणार आहेत.

Latest News