चिनी सैन्याशी लढा देताना ” शहीद झालेले राजेश ओरंग” घरात लग्नाची तयारी होती सुरू


सूरी, पश्चिम बंगाल : लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्याशी लढा देताना शहीद झालेले राजेश ओरंग तीन भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. 2015 मध्ये ते सैन्यात दाखल झाले होते. बुधवारी सकाळी त्यांचे शोकग्रस्त वडील सुभाष म्हणाले, “माझ्या मुलाने देशाची सेवा केली आणि त्याच्यासाठी त्याने बलिदान दिलं.”
राजेशची आई मात्र सध्या काहीही बोलण्याच्या परिस्थितीत नाही. पुढच्या सुट्टीत मुलगा घरी आला की त्याचे लग्न लावून देण्याची तयारी त्यांच्या घरात सुरू होती. सुभाषने सांगितले की, राजेशला दोन लहान बहिणी आहेत. 2015 मध्ये ते सैन्यात भरती झाले होते आणि ते बिहार रेजिमेंटचे होते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी राजेशच्या मृत्यूची माहिती दिली. ते सुमारे 20 वर्षांचे होते. ‘लहानपणापासूनच माझ्या भावाला देशाची सेवा करायची होती आणि सैन्यात भरती झाल्याने त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचे शहीद राजेश यांच्या बहिणीने सांगितले. काही महिन्यांपूर्वी ते रजेवर घरी आले होते आणि त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. बीरभूम जिल्ह्याअंतर्गत मोहम्मदबाजार पोलीस ठाण्यातील बेल्जोरिया या गावी एका साध्या शेतकऱ्याच्या घरात त्याचं बालपण गेलं. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत सोमवारी रात्री मृत्यू झालेल्या 20 भारतीय जवानांपैकी राजेश हे एक होते. पाच दशकांत चीनबरोबरची ही सर्वात मोठी लष्करी चकमक असून या प्रदेशात सध्या सुरू असलेल्या लष्करी गतिरोधात भर पडली आहे.