डॉ. आनंद तेलतुंबडे मदतीसाठी राज्यभरात होणार निषेध आंदोलन


डॉ. आनंद तेलतुंबडे मदतीसाठी राज्यभरात होणार निषेध आंदोलन ,
लोकशाही हक्क संघर्ष समिती डाव्या आणि आंबेडकरी संघटनांचा इशारा


मुंबई, ३ फेब्रुवावरी, प्रतिनिधी :दलित विचारवंत आणि मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्यावर त्यांच्यावर सूडबुद्धीने लावलेल्या पोलीस केस आणि त्यांना झालेली अटक, या विरोधात लोकशाही हक्क संघर्ष समिती आणि डाव्या आणि आंबेडकरी पक्ष संघनांच्या वतीने महाराष्ट्रात सर्वत्र निषेद सभा आणि आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी तात्काळ सायंकाळी दादरच्या आंबेडकर भवनात डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्यासाठी डाव्या आणि आंबेडकरी पक्ष संघटनाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. लोकशाही हक्क संघर्ष समितीच्या वतीने राज्यभरात प्रत्येक तालुक्या तालुकायत सरकारच्या विरोधात आणि तेलतुंबडे यांच्या पाठिंब्यासाठी निषेद सभा घेण्यात येणार आहेत. ६ फेब्रुवारी पासून आय निषेध सभा आंदोलन होणार आहे. ६ फेब्रुवारीला दादरच्या आंबेडकर भवनात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आल्याची माहिती को.शैलेंद्र कांबळे, सुमेध जाधव यांनी दिली. मुंबईत होणाऱ्या या सभेत साहित्यकार प्रा. प्रज्ञा दया पवार, पत्रकार हसन कमाल, जेष्ठ पत्रकार विचारवंत निखिल वागले,कॉ. महेंद्र सिंग ,कॉ प्रकाश रेड्डी, गांधीवादी विचारवंत जी. जी.पारीख,सामाजिक कार्यकर्ती तिष्ठआ सेटलवाड, रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड, मिलिंद भवार आदी मान्यवर या सभेला संबोधित करणार आहेत.मोठया संख्येने कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहे. अशी माहिती ,साहित्यिक पत्रकार सुबोध मोरे यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी दादरच्या आंबेकर भवनात झालेल्या बैठकाणीला भारतीय कम्युनिश पक्ष, मार्क्सवादी कम्युनिश पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भाकपा ( माले) तसेच भारीप बहुजन महासंघ, जातीअंत संघर्ष समिती, रिपब्लिकन प्यान्थर, कोरो , अश्या शेकडो संघटना आणि आणि त्यांचे प्रमुख पुढारी कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. होत. साहित्यिक ज वि पवार, कॉ. प्रकाश रेड्डी,महिंद्रा सिँग, भाई राजू कोरडे,फिरोज मिठीबोरवाला सुमेध जाधव, शैलेंद्र कांबळे, श्याम गोहिल व इतर प्रमुख कार्यकर्ते आणि नेते यांनी ६ फेब्रुवारीच्या निषेध सभा आंदोलनाची तयारी केली आहे.
दलित विचारवंत आणि मानवी हक्क कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे यायचं कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून शनिवारी पहाटे साडेतीन वाजता मुंबई विमानतळावरून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दुपारी तेलतुंबडे यांना पुणे येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यांच्यावरील अटकेची कारवाई बेकायदेशीर ठरवत पुणे येथील विशेष सत्र न्यायालयाने तेलतुंबडे यांची सुटका करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर काही वेळातच तेलतुंबडे यांची सुटका करण्यात आली आहे होती. आय घटनेचे पडसाद राज्यभरात पडले.यानंतर शनिवारी तात्काळ या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Latest News