भाजपमुळे पक्षाचा मोठा तोटा – जदयू

बिहार: राज्यात एनडीएचे नवीन सरकार बनून दोन महिने झाले आहेत, मात्र जदयू नेत्यांच्या मनात भाजपविषयी खदखद कायम आहे. शनिवारी पक्षाची राज्य कार्यकारिणी आणि पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. या वेळी दिग्गज नेत्यांनी भाजपच्या ‘अंतरंगा’ची पोलखोल केली. नितीशकुमारांपुढे एकापाठोपाठ एक माजी आमदारांनी भाजपविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. चिराग पासवान हे एक मोहरा होते, प्रत्यक्षात पडद्यामागे सगळा खेळ भाजपनेच केला. त्यांच्या नेत्यांनी मदतीचे दावे केले, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मतदार व कार्यकर्त्यांनी जदयू उमेदवारांना कुठलीही साथ दिली नाही, असा दावा जदयू नेत्यांनी केला. सीमांचल प्रांतातील उमेदवारांनीही भाजपमुळे पक्षाचा मोठा तोटा झाल्याचा आरोप केला. एनआरसीबाबत भाजपचे धोरण एक व त्यांच्या माजी मंत्र्याने केलेले विधान वेगळे. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला व त्याचा फटका आम्हाला बसला

Latest News