वाशिमच्या एका तरुणाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र…

मुंबई :वाशिमच्या एका तरुणाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोकरी नसल्याने माझं वय ३५ वर्ष असून, माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण गेल्या ७ वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पण कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते. दैनंदिन जीवनात किती अडचणी येत आहेत याचा लेखाजोखा पात्रातून मांडला आहे. मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, अशी मागणी या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. गजानन राठोड असे या तरुणाचे नाव आहे. त्याने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ण तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण झाले आहे,’ अशी खंत वाशिमच्या गजानन राठोडने पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, ही नम्र विनंती.

Latest News