पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदी नितीन लांडगे

IMG-20210305-WA0166

अ‍ॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे*जन्मदिनांक : 4 नोव्हेंबर 1969शिक्षण : बी. कॉम. एल.एल.बी. (प्राथमिक शिक्षण हिंदूस्थान अँटीबायोटिक्स स्कूल, उच्च माध्यमिक दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेचे स्वामी विवेकानंद महाविद्यालय, एल.एल.बी. पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज)2002 : भोसरीतून तीन नगरसेवकांच्या पॅनलमधून पहिली निवडणूक लढविली. 2012 व 2017 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भोसरी गावठाण प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी.वडील ज्ञानेश्वर पांडुरंग लांडगे यांच्याकडून समाजकार्याचे व राजकारणाचे बाळकडू मिळाले. पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी ज्या निवडक व्यक्तींची नावे घेतली जातात त्यामध्ये ज्ञानेश्वर लांडगे यांचे नाव शहराचे शिल्पकार म्हणून आदराने घेतले जाते. पवना सहकारी बँकेची स्थापना, तसेच पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट या नामांकित शैक्षणिक संस्थेत अनेक वर्षांपासून अध्यक्ष पदावर हे कार्यरत आहेत. 2012 आणि 2017 च्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यामध्ये उल्लेख केलेली बहुतांशी विकासकामे माझ्या कार्यकालात पूर्ण झाली. यामध्ये धावडेवस्ती ते भोसरी गावठाण हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा रस्ता पूर्ण करण्यात आला. सर्व्हे क्र. 1 येथे उभारण्यात आलेले सुसज्ज मल्टी स्पेशालिटी 100 बेडचे भोसरी नूतन रुग्णालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यास सुरुवात कुस्ती प्रशिक्षण केंद्राची प्रेक्षक गॅलरी कबड्डी प्रशिक्षण केंद्राची उभारणी. प्रशस्त व स्वच्छ दशक्रिया विधी मंडप बांधून घेतला. नूतन भोसरी रुग्णालयाचा कोरोना कोविड-19 या जागतिक महामारीच्या काळात हजारो नागरिकांना उपयोग झाला. भोसरी पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण करण्यात आले. पीसीएमटी चौक भोसरी येथे करसंकलन कार्यालय इमारतीत स्पर्धा परिक्षा केंद्राची सुरुवात. प्रभागात आवश्यक तेथे महिलांसाठी स्वच्छतागृह त्याचबरोबर 90 कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृह बांधून दिले. आदिनाथनगर येथील नाल्यामधून पावसाळ्यामध्ये परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी येत होते. या नाल्यास संरक्षक भिंती बांधून या परिसरातील नागरिकांना दिलासा दिला. भोसरीतील जुनी मंडई येथे संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुल बहुमजली इमारत बांधली. भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज शाळेत संविधानाची प्रत उभारण्यात आली. भोसरीतील बापूजीबुवा मंदिरसमोर मनपाची आधुनिक शाळा उभारण्यास सुरुवात. पुणे-नाशिक महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रिट डेव्हलपमेंटचे काम प्रगतीपथावर. भोसरी गावातील लांडगे लिंबाची तालीमच्या माध्यमातून सार्वजनिक कामास सुरुवात. या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात प्रबोधनात्मक हलते देखावे, जिवंत देखावे सादर करून समाज प्रबोधन केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत आतापर्यंत अनेकदा प्रथम क्रमांकाची बक्षीसे मिळविली आहेत. 2007 साली भोसरी कला क्रिडा मंच या सांस्कृतिक व्यासपीठाची स्थापना केली. या माध्यमातून स्थानिक कलाकारांना मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू रामदास लांडगे यांच्या गौरवार्थ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. 1991 साली देखील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन. जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे तीन वेळा आयोजन. शिक्षण, कला, क्रिडा, आरोग्य, पर्यावरण, सहकार, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविले……………..

Latest News