अर्थसंकल्प राज्य सरकारचा की मुंबई महापालिकेचा?

मुंबई | हा अर्थसंकल्प राज्य सरकारचा की मुंबई महापालिकेचा?, हाही प्रश्न निर्माण होतो आहे. ट्रान्सहार्बर लिंक, वांद्रे-वर्सोवा हे सारे आमच्या काळात सुरू झालेले प्रकल्प आहेत. तीर्थक्षेत्र विकासाचे सारे प्रकल्प सुद्धा आमच्या काळात सुरू झालेले, त्यामुळे त्यातही काहीही नवीन नाही. या अर्थसंकल्पाने संपूर्णपणे निराशा केली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही. मूळ कर्जमाफीच्या योजनेत 45 टक्के शेतकरी वंचित राहिले असून त्यांना एका नव्या पैशाची मदत झालेली नाही. शेतकऱ्यांना धान्यासाठी, विज बिलासाठी कुठल्याही प्रकारे सवलत दिलेली नाही. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज ही फसवी बाब असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 80 टक्के शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची मर्यादाच 50 हजार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही, असंही फडणवीस यांनी सांगितलं.महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निराशा व्यक्त केली असून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने आपला दुसरा अर्थसंकल्प मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. सरकारच्या या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाने लगेचच टीका केली आहे. या अर्थसंकल्पामधील अनेक योजना भाजपच्या काळातील आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे “घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ” आणि शब्दांचे बुडबुडे तसेच “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” असं मी म्हणेन! कारण कोकण, विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. कोकण, विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय करणारा अर्थसंकल्प! कारण कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची आमची मागणी होती, ती पूर्ण झाली नाही. तसेच मराठवाडा-विदर्भाचा या ठिकाणी विचार केला आहे की नाही?, असा प्रश्न पडतो सरकारला उद्याच्या चर्चेत याची उत्तरे द्यावी लागतील, असंही प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाने केेलेल्या या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार तापले आणि पवारांनी विरोधकांना त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे दरम्यान, मी काय आज अर्थसंकल्प मांडत नाही. 2009 ते 14 पर्यंत मी 4 अर्थसंकल्प मांडले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनीही मांडले आहेत. अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नसल्याचं अजित पवार म्हणाले.