पुण्यातील औंध,बाणेर कोरोनाचे हॉटस्पॉट 11 क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत रुग्ण वाढ.

पुणे -पालिकेच्या १५ पैकी ११ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्वाधिक मायक्रो कंटेन्मेंट झोन औंध-बाणेरमध्ये असून सर्वाधिक ‘हॉटस्पॉट’ शिवाजीनगर परिसरात आढळून आले आहेत. जून ते सप्टेंबर या काळात सर्वाधिक असलेले रुग्ण जानेवारीपर्यंत कमी झाले होते. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालिकेकडून गेल्याच आठवड्यात ४२ सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रघोषित करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये आणखी २० सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रांची भर पडली असून एकूण संख्या ६२ झाली आहे
.परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ज्याठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत, अशा ठिकाणांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाऊ लागले आहे. शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून शाळा-महाविद्यालये आणि खासगी क्लासेस १४ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र निश्चित काही प्रमाणात निर्बंध घालण्यास सुरुवात करण्यात आली असून याठिकाणी फलक लावणे, आवश्यकतेनुसार बॅरिकेटस लावण्यात येत आहेत.
क्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आणि हॉटस्पॉट क्षेत्रीय कार्यालय प्रतिबंधित क्षेत्र
औंध-बाणेर – १९ –शिवाजीनगर – ०८०४कोंढवा-येवलेवाडी – ०८ ००
हडपसर-मुंढवा – ०७ –कसबा-विश्रामबाग – ०६ ०३ नगररस्ता – ०५ ०१
बिबवेवाडी – ०५ –वारजे – ०३ ०१ भवानी पेठ – ०१ –एकूण – ६२ ०९
पुणे शहरात गेल्या चोवीस तासांत 753 करोनाबाधित आढळले असून, 700 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उपचारादरम्यान पुण्यातील सात जणांसह 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे.शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 735 झाली आहे. यापैकी 690 रुग्ण ऑक्सिजनवर असून 358 रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंतची रुग्णसंख्या 2 लाख 9 हजार 83 झाली असून त्यापैकी 1 लाख 96 हजार 751 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
. दरम्यान, मागील चोवीस तासांत 6 हजार 735 संशयितांची करोना टेस्ट करण्यात आली असून आतापर्यंत करण्यात आलेल्या टेस्टची संख्या 11 लाख 98 हजार 536 झाली आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढत असून, ऍक्टिव्ह रुग्णांपैकी जवळपास 77 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. हे सर्वजण घरीच उपचार घेत आहेत. रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता, महापालिकेच्या दळवी रुग्णालयातील ऑक्सिजन बेड तसेच विमाननगर येथे उभारलेल्या करोना सेंटरमध्येही ऑक्सिजन बेडस् सुरू केले आहेत
. तर, सीओईपी जंबो हॉस्पिटल कार्यन्वित करण्यासंदर्भात सीओईपीकडून स्ट्रक्चरल ऑडिटही करून घेण्यात आले आहे. 12 मार्चला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.