दोन महिन्यातील फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद…जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

फेरफार अदालती मंडळस्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी मागील दोन महिन्यातील फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद–
पुणे दि.9: लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळस्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी घेवून जनतेच्या प्रलंबित साध्या वारस तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. तरी या फेरफार अदालतीसाटी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राजेश देशमुख यांनी केले आहे जिल्हा प्रशासनाने यापुर्वीच प्रलंबित नोंदीबाबत विशेष मोहीम घेऊन मागील तीन महिन्यात ८३ हजार ०७४ नोंदी निर्गत केल्या आहेत. शासन निर्णयानुसार महिन्याच्या दुस-या बुधवारी फेरफार अदालत घेण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये मागील दोन महिन्यातील फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यामध्ये एकुण ७ हजार ९८६ फेरफार नोंदी निर्गत झाल्या आहेत. जिल्हयात आज रोजी २७हजार ०३२ नोंदी प्रलंबित असून त्यापैकी १७ हजार ४५३ नोंदी, नोटीस काढणे व बजावणेवर प्रलंबित आहेत. 9 हजार ५७९ नोंदी या प्रमाणीकरणासाठी उपलब्ध असून यापैकी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने फेरफार अदालतीमध्ये प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी तहसिलदार देखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहणार असून जिल्हा स्तरावर अधिकारी देखील काही मंडळामध्ये उपस्थित राहणार आहेत. तरी या फेरफार अदालतीसाटी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राजेश देशमुख यांनी केले आहे.