पिंपरी चिंचवड १० मार्च २०२१ रोजी ‘यशस्वीनी पुरस्कार’ सोहळा होणार


दिनांक १० मार्च २०२१ रोजी नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या कॅम्पसमध्ये यशस्वी संस्था व कल्पतरू इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा ‘यशस्वीनी पुरस्कार’ देऊन सन्मान करण्याचे ठरले आहे.
श्री. कृष्ण प्रकाश,पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा
संपन्न होणार असून व्यासपीठावर शोभा कुलकर्णी मॅडम, कल्पतरू इव्हेंट्सच्या संचालिका दीप्ती शेखावत, आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे व ‘यशस्वी’ चे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सदर कार्यक्रम संस्थेच्या हॉल क्रमांक १०१ मध्ये संध्याकाळी ६:३० वाजता सुरु होणार असून सदर कार्यक्रमाला मोजक्या २५ ते ३० जणांचीच उपस्थिती असणार आहे.
तरी सदर कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी आपल्या वर्तमानपत्राचे पत्रकार प्रतिनिधी यांना पाठवावे ही नम्र विनंती. कार्यक्रमाचे नाव : ‘यशस्वीनी पुरस्कार’ वितरण सोहळा कार्यक्रम स्थळ : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस), एल्प्रो कंपनी चौक, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या पुढील चौक, चिंचवड गांव,पुणे ३३. दिनांक : १० मार्च २०२१ वेळ :संध्याकाळी ६: ३०वाजता. अधिक माहितीसाठी संपर्क :योगेश रांगणेकर मोबा : 7350014536 / 9325509870
टीप : सदर कार्यक्रम कोरोना नियमावलीचे पालन करून होणार आहे.