PCMC माजी महापौर राहुल जाधव यांच्या सौभाग्यवती चा प्रभागातील महिला भगिनींशी थेट भेटण्


पिंपरी ( प्रतिनिधी ) प्रभाग क्रमांक २जाधववाडी चिखली मध्ये मा.महापौर राहुलदादा जाधव यांच्या सौभाग्यवती सौ.मंगलताई राहुलदादाजाधव यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून प्रभागातील महिला भगिनींशी थेट भेटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रभागातील महिला भगिनींच्या समस्या ऐकून घेण्यासाठी सौ.मंगलताई राहुलदादा जाधव यांनी प्रत्यक्ष महिलांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या
, व महिलांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रभाग क्रमांक२ मध्ये बराचसा भाग हा नवीन विकसित होत आहे. अनेक मोठ मोठे गृह प्रकल्प या भागांमध्ये विकसित होत आहे. तरी या नवीन ग्रुप प्रकल्पामधील महिला भगिनींच्या काही समस्या असतात त्या समस्या समजून घेण्याचा सौ.मंगलताई राहुलदादा जाधवजाधव यांनी प्रयत्न केला.या वेळी विविध सोसायटींच्या व प्रभागातील इतर महिला भगिनींनी सौ.मंगलताई राहुलदादा जाधवयांचा स्थोचीत सन्मान केला आपल्या सत्काराला उत्तर देताना सौ.मंगलताई राहुलदादा जाधव पुढे म्हणाले की आपल्या महाराष्ट्रला जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांसारख्या महिलांचा वारसा लाभला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मी महापौर राहुल दादा जाधव तसेच भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचे काम करत आहे .आणि यापुढे सतत प्रभागातील महिला भगिनींसाठी तत्पर राहील.