पिंपरी महापालिकेचे वैदकीय अधिकारी अनिल रॉय,अजित पवार यांच्यावर कारवाई करावी:महापौर माई ढोरे
पिंपरी ( विनय लोंढे ) –भाजप राष्ट्रवादीच्या आरोप प्रत्यारोपां नंतर पाच तासांच्या चर्चेअंती सर्वसाधारण सभेत पिंपरी-पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना अतिरिक्त आयुक्त -२ अजित पवार आणि निवासी वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांच्यावर झालेल्या आरोपा नुसार त्यांची चौकशी करुन त्यांच्याकडील अधिकार काढण्याचे आदेश महापौर माई ढोरे यांनी आयुक्ताना दिले आहेत. पिंपरी -चिंचवड महापालिकेत भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी उपस्थीत केलेल्या पाच प्रश्नवरून महापालिकेच्या सर्व साधारण सभेत खडाजंगी झाली. ऑक्सिजनच्या अभावामुळे वायसीएम रुग्णालयात नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप कामठे यांनी केला होता .यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा ठेकेदार ‘गॅब ‘ ला याप्रकरणी काळ्या यादीत टाकण्याचे आदेश यावेळी महापौर उषा उर्फ माई त्यांनी दिले आहेत.चौकशी पूर्ण करण्यासाठी २० दिवसांची गरज भासणार असल्याचे महापालिका आयुक्त पा टील यांनी नमूद केले. परंतु महापौर माई ढोरे यांनी आयुक्त रीजेश पाटील यांना दिवसरात्र काम करून चौकशी लवकर करावी आणि ते 18 मार्च रोजी होणा -या सर्वसाधारण सभेत सादर करा ढोरे यांनी नगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना पाच तासाच्या चर्चे अंती सर्वसाधारण समितीच्या (जीबी) सभेत आदेश दिले.नगरसेविका आशा शेडगे सांनी स्पर्श कोविडसेंटरला अदा केलेल्या ३ कोटी १८लाखच्या भ्रष्टाचारामध्ये सामील असणा-यांची चौकशी करावी असे मत मांडले..नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या की आरोपी व्यक्तींची लाचलुचपत प्रतिबंधक चौकशी करून या प्रकरणांमध्ये कोण सहभागी आहे याचा तपास घ्यावामहापौर माई ढोरे यांनी स्पर्शच्या कोविड केअर सेंटरला तीन कोटी १८लाख प्रकरणात बिले भरण्याबाबत चौकशी करण्याची सूचना दिल्या. या सर्व चौकशी त्वरित पूर्ण कराव्यात आणि १ मार्च रोजी होणा-या मासिक सर्वसाधारण सभेत त्यांचे अहवाल (जीबीकडे)सर्व सामान्य सभेत सादर करावेत, अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली. . भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्पर्श र्विरोधात कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याची धमकी दिली. माजी नगरसेवक एकनाथ पवार म्हणाले की दोषी नगरसेवक ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. दोषी नगरसेवक 10 वर्षे निवडणूक लढू शकणार नाहीत.वायसीएम रुग्णालयाच्या गॅस पाइपलाइनचे थर्ड पार्टी ऑडिट करावे अशी मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली. नगरसेविका माया बारणे यांनी सल्लागार समितीवर टिका करीत समितीवर होणा- या लाखो रुपयांचा पालिकेने खर्च टाळावा असे मत मांडत मोकाट कुत्र्यांचा मुद्दा मांडत कुत्र्यांच्या नसबंदीवर होणा-या लाखो कोटी रुपयांचे नुकसान कसे होते,नसबंदीसाठी जर कोटी रुपये खर्च होउन कुत्र्यांच्या वाढत्या संखेला आळा का बसत नाही असे मुद्दे उपस्थीत केले