सिद्धी मित्तल यांना “राष्ट्रीय सेवा सन्मान” राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

सिद्धी मित्तल यांना “राष्ट्रीय सेवा सन्मान”
…………….
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान
……

पुणे :

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई राजभवन येथे संस्कार पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापक सिद्धी मित्तल यांना “राष्ट्रीय सेवा सन्मान 2021” देऊन गौरविण्यात आले. गौ रक्षक सेवा ट्रस्टने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

अभिनेत्री आएशा जुल्का, केंद्रीय फ़िल्म सेन्सर बोर्ड सदस्य चाँद सुल्ताना, अॅड.अनुराधा शिंदे , समाजसेविका रूबीना रिज़वी यांच्यासहित कर्तृत्ववान महिलाना “राष्ट्रीय सेवा सम्मान” ने गौरव करण्यात आला.

सिद्धी मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केले आहे . समाजकार्यात देखील त्यांनी योगदान दिले आहे.क़ोरोना साथी दरम्यान सिद्धी मित्तल यांनी मदत अभियान आयोजित केले होते.

………………………………………