तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला….

मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये तीन ते चार तासांपासून लोकांच्या भेटीगाठी घेत होत्या. त्यावेळी कोणताही स्थानिक पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात नव्हता “चार-पाच लोकांनी गाडी बंद केली. त्यावेळी कोणताच लोकल पोलीस कर्मचारी नव्हता. एसपी देखील नव्हते. हे जाणूनबुजून करण्यात आलंय. माझ्या छातीतही दुखतंय”, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली आहे. हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत कारमध्ये बसवलं. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपण काही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं सांगितलंममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना आता तातडीने कोलकात्याला आणलं जात आहे. कोलकाताच्या व्यूह रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

“ममता बॅनर्जी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ठाऊक आहे की, आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळे त्या सहानुभूतीसाठी प्रयत्न करत आहेत”, असं अर्जुन सिंह म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली असतानाच आता एका महत्त्वाच्या घटनेनं सर्वाचं लक्ष वेधलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांना निवडणुक प्रचारादरम्यान दुखापतीचा सामना करावा लागला आहे. नंदीग्राममध्ये त्यांच्या पायाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब समोर येत असून, त्यांना हलवण्यात आलं आहे.  आपल्यासोबत झालेली ही दुर्घटना राजकीय द्वेषापोटी झाली असून, यामागे सुडाची भावना असल्याची बाब त्यांनी प्रकाशात आणली. शिवाय सदर घटनेबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बॅनर्जी यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार समोर आली असून, त्यांच्यासोबत ही घटना घडली त्यावेळी स्थानिक पोलीस त्यांच्यासोबत नव्हते.   दरम्यान, यंदाच्या वर्षी ममता बॅनर्जी यांनी त्यांची अनेक वर्षांपासून चालत आलेली भवानीपूर येथील उमेदवारीची जागा सोडत नंदीग्राम येथून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. भारतीय जनता पक्षाकडून इथं शुभेंदू अधिकारी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. शुभेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय होते. पण, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ते थेट बॅनर्जी यांच्याविरोधातच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.  पश्चिम बंगालमध्ये आठ सत्रांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. 27 मार्चपासून राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे, तर नंदीग्राममध्ये 1 एप्रिलला मतदान होणार आहे. ममता बॅनर्जी या मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्यामुळं या भागानं साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आहे.