भाजपचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री


डेहराडून | राज्यात नवा मुख्यमंत्री कोण होणार यावर बरेच तर्क लावण्यात आले. आज डेहराडून येथे भाजपच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक झाली. त्यात गढवाल येथील खासदार तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तीरथ सिंह रावत आज सायंकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल बेबी राणी मोर्य यांची भेट घेणार असल्याच सांगितल्या जात आहे
. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. रावत हे उत्तराखंड भाजपचे अध्यक्षही राहिलेले आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिवही आहेत. त्याशिवाय भाजपच्या राज्यस्तरावरील अनेक पदांवर त्यांनी काम केलं आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भाजपचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरू आहे. त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी नियुक्त झाल्यावर रावत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना सांगितलं,
मी संघासाठी काम करत होतो. भाजपमध्ये येण्याचा कधीच विचार केला नव्हता पण अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मी सक्रिय राजकारणात आलो. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यासोबत मी दीर्घकाळ काम केलं होतं. आधी संघप्रचारक म्हणून काम केलं त्यानंतर पार्टी आणि सरकारच्या स्तरावर काम केलं. आजही त्रिवेंद्र सिंह रावत आपले मार्गदर्शक असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, तीरथ सिंह रावत यांचा जन्म 9 एप्रिल 1964 साली झाला. सध्या ते लोकसभेत पौडी मतदारसंघाच प्रतिनिधित्व करतात. त्याआधी ते 2012 ते 2017 या दरम्यान चौबद्दाखाल मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी पत्रकारितेत डिप्लोमा केला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लगेचच संघासोबत काम करायला सुरवात केली.