सुधीर मुनंगटीवार यांना सरकारमध्ये नसल्याने शल्य प्रचंड बोचतय :अजितदादा पवार

मुंबई ( प्रतिनिधी ) . अधिवेशन सुरू झाल्यापासून सुधीर मुनगंटीवार हे सरकार पडणार, सरकार बरखास्त होणार, राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे, असं वक्तव्य मुनंगटीवार यांनी केली आहे.देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहे. मराठी मध्ये एक म्हण आहे ‘सहन ही होत नाही, सांगता ही येत नाही’ काही जणांना आपण या सरकारमध्ये नाही याचे शल्य प्रचंड बोचत आहे.

राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के वाढ झाली आहे. बळीराजाने आपल्या राज्याला वाचवले वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना शून्य टक्के व्याज दिले जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना  हजारांचं अनुदान देण्याचा आम्ही विचार करतोय, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव न घेता विधानसभा निवडणुकीत पराभव कसा झाला याबद्दल सूचक वक्तव्य केले आहे. सुधीर मुनगंटीवार यांना आपण सरकारमध्ये नाही याचे शल्य प्रचंड बोचत आहे. अर्थसंकल्पीय भाषणाला उत्तर देत असताना  अजित पवार यांनी भाजप नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था होऊन जाते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा साधला आहे. तीन महिन्यात सरकार कोसळेल असं सूचक विधान करणारा शेर मुनगंटीवारांनी नुकताच विधानसभेत सादर केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र पवारांनी मात्र मुनगंटीवारांच्या या विधानाचा चांगलाच खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना पवार म्हणाले की,बोलण्याची संधी मिळाली की मुनगंटीवार नेहमी सरकार पाडणार किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणार अशी वक्तव्य करत असतात. सत्ता गेल्यामुळेच त्यांना वैफल्य आलं आहे. तसेच परळीत धनंजय मुंडे निवडून आले पण त्यांच्या पक्षाच्या पंकजा मुंडे यांना कोणी पाडले याची चर्चा पूर्ण राज्यभर आहे. भाजपमधील अनेकांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही तर काही जण नेमके पराभूत झाले, असं टोला लगावायलाही पवार यावेळेस विसरले नाहीत.

चंद्रकांत पाटील शांत स्वभावाचे असून ते योग्य वेळ आल्यावरच बोलतात असं म्हणत त्यांनी विधानसभेत हशा पिकवून दिला. तर एकनाथ खडसेंची भाजपने काय अवस्था केली, असा प्रश्न विचारत त्यांनी विरोधी पक्षाला डिवचलं आहे.दरम्यान कोरोनाचं संकट असतानाही शेती, पायाभूत सुविधा, आरोग्य अन् महिला सक्षमीकरण यावर राज्य सरकारनं भर दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा विज उपलब्ध होण्यााठी 5 लाख विजपंप उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळेस केली आहे.