पिंपरी चिंचवड पालिकेच्या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी औषधांचा तुटवडा

पालिकेच्या दवाखान्यात कोरोनाग्रस्तांसाठी औषधांचा तुटवडा

पिंपरी ( प्रतिनिधी ) शहरात कोरोनाचे रुग्ण परत वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यात स्पर्श हॉस्पिटलचे ३ कोटीचे बिल देण्यावरून वाद सुरु आहे. त्यातच ऑटो क्लस्टर येतील स्पर्श हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेशचे युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांना स्पर्श हॉस्पिटलमधून एका कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकाचा फोन आला की आम्हाला बाहेरून औषधे आणण्यास सांगत आहेत. एकदा ८००० रुपयांची औषधे आणली आता परत औषधाची चिट्टी दिली आहे. त्या रुग्णाची व्यथा ऐकून तात्काळ रविकांत वरपे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला .
पालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणाले कि औषधे महाग आहेत. यावेळी वरपे म्हणाले की आपण जनतेच्या करातून औषधे जनतेसाठी आणत आहोत. जीव महत्वाचा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. ७००० कोटी रुपयांचे बजेट मांडणाऱ्या पालिकेत कोरोना काळात बाहेरून औषधे आणण्याची घटना म्हणजे भाजपची प्रशासनावर पकड नाही.
रविकांत वरपे आणि माधव पाटील यांनी मग थेट पालिका गाठत पालिकेचे अतिरिक्त विकास ढाकणे यांना यासंबंधी निवेदन देउन यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली. विकास ढाकणे यांनी तात्काळ आरोग्य अधिकाऱ्यांना फोन करून याकडे लक्ष देण्यास सांगितले.
यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष माधव पाटील ,महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सरचिटणीस निलेश पुजारी , राष्ट्रवादी युवक पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष निखिल दळवी ,मंगेश बजबळकर ,विराज कुटे आणि गणेश कोनमाने उपस्तिथ होते.

Latest News