नगर अर्बन बँकेच्या बोगस कर्जप्रकरण, डॉ निलेश शेळके याला अटक

पिंपरी ( प्रतिनिधी ) नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी 11 कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आलेली आहेत. त्यात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक केल्या आरोपावरून कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्कालीन संचालक नवनीत सुरपुरिया, यज्ञेश चव्हाण, आशुतोष लांडगे, जयदीप वानखेडे यांना अटक केली

. शहर बँकेच्या गुन्ह्यात अटकेत असलेले डॉ. नीलेश शेळके याचे नाव नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्यात निष्पन्न झाले. 22 कोटींपैकी काही रक्कम डॉ. शेळके यांच्या खात्यावर गेली असल्याचे तपास समोर आले.नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटींच्या अपहारप्रकारणात डॉ. नीलेश शेळके याचे नाव समोर आले होते.

शहर बँकेच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या डॉ. शेळके याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आज अटक केली.त्याला मंगळवार (दि. 16) रोजी मोरवाडी न्यायालयात हजर करणार, असल्याचे चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले. त्यामुळे अटक आरोपींच्या आता पाच झाली आहे.शहर बँकेच्या गुन्ह्यात शेळके अटक असल्याने ताब्यात घेण्यासाठी दोन दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक नगरमध्ये तळ ठोकून होते. मात्र, डॉ. शेळके याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी गुन्ह्यात वर्ग करण्याची सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून डॉ. शेळके याला आज अटक केली.

या गुन्ह्यात तत्कलीन संचालक, अधिकारी, कर्ज समितीचे सदस्य यांचा समावेश आहे. त्यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य 16 जणांना पोलीस कसून शोध घेत आहेत.

Latest News