घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही; शरद पवारांनी

घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही; शरद पवारांनी

मुंबई ( प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही 12 आमदारांच्या नियुक्त्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही, असं म्हणत शरद पवारांनी भगतसिंह कोश्यारींवर टीकास्त्र सोडलं आहे. ते बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही. हा गोष्ट आहे, असं शरद पवार म्हणालेत. मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना देखील तत्कालीन राज्यपालांनी अशाप्रकारचा त्रास दिल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या. ……
महाराष्ट्रामध्ये देखील राज्यपाल याच पद्धतीने राज्यशासनाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी मात्र केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.शरद पवारांनी यावेळी बोलताना शेतकरी आंदोलावरही भाष्य केलं. शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना खलिस्थानी, दहशतवादी संबोधत असतील तर यावर काय भाष्य करणार