पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येईल: शरद पवार


नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तसेच पश्चिम बंगालमधील नागरिक स्वाभिमानी असून बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर संपूर्ण बंगाल एकसंघ होतो, असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे.
बारामतीतील माळेगाव तालुक्यातील गोविंदबाग या निवस्थानी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. यादरम्यान या निवडणुका पाच राज्यांमध्ये होत असल्या तरी आसाममध्ये भाजपचे राज्य असल्यामुळे इतर पक्षांपेक्षा भाजपची स्थिती चांगली आहे. याच कारणामुळे आसाममध्ये भाजप त्यांची सत्ता यशस्वीपणे राखू शकेल, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांचा समावेश होतो. मात्र या राज्यांच्या निवडणुकी दरम्यान भाजप फक्त एक राज्य जिंकू शकतो, असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी वर्तवलं आहे.दरम्यान, कोणी काही बोललं तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीचसत्ता येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.