पुण्यात वीज कनेक्शन तोडल्याच्या रागातून एकाने महावितरणच्या महिलेला घरातच कोंडले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी कुलसंगे महावितरणमध्ये टेक्नीशियन पदावर आहेत. दोन दिवसांपुर्वी त्या मंगळवार पेठेतील सुखनिवास सोसायटीतील थकीत वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेल्या होत्या. सलीम यांचे 11 हजार 481 रूपये बीजबिल थकले होते. त्यामुळे माधुरी यांनी त्यांच्या घराचे वीज कनेक्शन तोडले. त्याचा राग आल्यामुळे सलीमने मीटररूमची कडी लावून माधुरी यांना कोंडून ठेवले. त्यानंतर माधुरी यांनी सहकारी शैलेश धुमाळ यांना घटनास्थळी बोलावून घेतले. आरोपी सलीमने त्यांनाही शिवीगाळ केली आहे.थकीत वीज बिलामुळे वीज कनेक्शन तोडल्याच्या रागातून एकाने महावितरणच्या टेक्नीशियन महिलेला घरात कोंडून त्यांच्या सहकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार पेठेतील सुखनिवास सोसायटीत घडला. याप्रकरणी तरूणाला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. सलीम बशीर सय्यद (वय 41,रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी माधुरी कुलसंगे (वय 28 ) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे अधिक तपास करीत आहेत.