राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल”:वरून सरदेसाई

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल”:वरून सरदेसाई


मुंबई ( प्रतिनिधी ) राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असंही वरुण सरदेसाई म्हणालेत

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडीच्या प्रकरणात थेट वरुण सरदेसाईंना ओढल्यानं मोठं राजकारण सुरू झालंय. त्यालाच आता युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय. मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असंही स्पष्टीकरण वरुण सरदेसाई यांनी दिलंय. त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असंही वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलंय.