राज्याच्या गृहमंत्र्यांनीच सचिन वाझे यांना 100 कोटी महिन्याला वसुल करायला सांगितले…

मुंबई |मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथे अँटिलिया प्रकरणाची पूर्ण माहिती देत होतो. त्या वेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले होतं. इतकंच नाहीतर उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरेतर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं असल्याचं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. एकीकडे माजी पोलीस आयुक्तांनी असे सनसनाटी आरोप केले आहेत तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.राज्याच्या गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी महिन्याला वसुल करायला सांगितले असल्याचा धक्कादायक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केला आहे

…..गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल शरद पवार, मुख्यमंत्री  आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीच कल्पना दिली होती, असा दावाही सिंह यांनी पत्रात केला आहे. यावर मुख्यमंत्री  आणि उपमुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

. सिंह यांच्या या आरोपाने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी जे पत्र लिहिलं होतं त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांचंही नाव घेतलं आहे.दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे, असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.