मोदी सरकारने तपास करावा – राज ठाकरे


मुंबई | महाराष्ट्रा राज्यात अनेक शहरं आहेत. त्यात अनेक पोलीस आयुक्त आहेत. त्यांना कितीचं टार्गेट देण्यात आलं? असा सवाल करतानाच या प्रकरणाचा केंद्र सरकारने तपास करावा. केंद्राने याचा तपास केल्यास राज्यात फटाक्याची माळ लागेल, असं राज ठाकरे यानी म्हटलं आहे
. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी सचिन वाझेंबाबतही वक्तव्य केलं.यापूर्वी अतिरेकी बॉम्ब ठेवतात असं ऐकलं होतं आता पोलीसच बॉम्ब ठेवत असल्याचं उघड झालं आहे. ही धक्कादायक बाब आहे. कुणाच्या तरी सांगण्यानुसार वाझे हे कृत्य करतील का? पोलिसांना कुणाच्या तरी सूचना असल्याशिवाय पोलीस हे धाडसच करणार नसल्याचं राज ठाकरे म्हणाले., हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते केवळ पोलीस दलातील वादाशी संबंधित नाही. तर बॉम्ब ठेवण्यापर्यंतचं हे प्रकरण आहे. त्यामुळे केंद्राने यात हस्तक्षेप करावा. केंद्राने याची चौकशी करावी. महाराष्ट्र सरकार या प्रकरणाची योग्य चौकशी होणार नाही. केंद्राने चौकशी चौकशी केली तर या प्रकरणात फटाक्याची माळ लागेल. अनेक अनाकलनीय चेहरे समोर येतील तर या प्रकरणात कोणकोण आत जातील याची कल्पनाही कोणाला करता येणार नसल्याचं ठाकरे म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी जमा करायला लावले असल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. राज्यभर खळबळ उडवणाऱ्या सचिन वाझे प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये माजी पोलीय आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपावरून राज ठाकरेंनी केंद्राने तपास करावा असं म्हटलं आहे.