पुण्यात एका महिलेला बेड न मिळाल्याने रस्त्यातच प्राण सोडावे लागल्याची धक्कादायक घटना समोर

पुणे | अरूलमेरी अँन्थनी या महिलेचा 1 तारखेला कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा आरकीदास अँन्थनी हा पाॅझिटिव्ह असताना त्याने त्याच्या आईला येरवड्यातील कोव्हिड सेंटरमध्ये घेऊन गेला. त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतू ससूनमध्ये बेड उपलब्ध नसल्याने त्यांना बाहेरच ताटकळत उभं राहावं लागलं काही वेळाने मुलाने जम्बो कोव्हिड सेंटर गाठलं. तिथेही त्यांना आडवण्यात आलं. आधी हेल्पलाईन नंबरवर माहिती द्या, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर हेल्पलाईन नंबर दिड तास व्यस्त होता. दिड तासानंतर फोन लागल्यावर त्यांना पाच मिनिटात कळवतो असं सांगण्यात आलं, परंतूू आतून कोणताही निरोप आला नाही. त्यानंतर शहरातील इतर रूग्णालयात विचारपूर केली, परंतू हाती काही लागलं नाही. त्यानंतर महिलेनं सकाळी साडेआठ वाजता प्राण सोडला. त्यानंतर देखील मृतदेह मिळवण्यसाठी मुलाला दहा तास उभा राहावं लागलं.नुकतंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर प्रशासनाकडून पुण्यात रूग्णसंख्येच्या तुलनेत बेड्स उपलब्ध आहे, असं सांगण्यात आलं होतं. परंतू पुण्याची आणखीच गंभीर आहे, हे वेळोवेळी स्पष्ट होत आहे. पुण्यात एका महिलेला बेड न मिळाल्याने रस्त्यातच प्राण सोडावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माझ्या आईला बेडची गरज होती. परंतू कोरोना हेल्पलाईन नंबर सतत व्यस्त होता. शहरातील सर्व रूग्णाालय फिरून झाले परंतू बेड्स नसल्यानं भरती करून घेतलं गेलं नाही. तिची ऑक्सिजन मात्रा फारच कमी होती. आई उपचाराविना रस्त्यातच गेली. प्रशासन सांगतंय की ऑक्सिजन व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत परंतू परिस्थिती वेगळीच आहे, असं आरकीदास अँन्थनी याने सांगितलं आहे.