… आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं उद्धव ठाकरे होय तुम्हीच जबाबदार

सातारा |मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्या नंतर विरोधकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, उद्योजकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत आणि फेसबुकपासून ट्विटपर्यंत सर्वत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर टीकेची झोड उठली आहे. आता भाजपचे आध्यात्मिक समन्वय आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.उद्धवजी, तुमच्या सरकारने ‘विषाणू’ ऐवजी ‘वसुली’ टारगेट ठेवलं आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं उद्धव ठाकरे होय तुम्हीच जबाबदार’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागलेली आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे.

Latest News