अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा


मुंबई ( प्रतिनिधी ) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून तो सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना भेटून राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. पवारांनी यासाठी होकार दिला आहे.
मुंबई हायकोर्टानं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय आज सकाळीच दिला होता त्यानंतर अगदी काही तासातच महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलाढाल दिसून आले आहे.सीबीआय चौकशीच्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या राजनामा पत्र ट्विटर वर नुकतेच काही मिनिटं पूर्वी नुकताच पोस्ट देखील केलं आहे. आजच हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप परबमीर सिंग यांनी केले होते त्यासंदर्भात सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची बातमी माध्यमात काही वेळा पूर्वी आलेली होती .देशमुख यांनी पवार यांच्याकडे आणि राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली केली होती .ती शरद पवार यांनी मान्य केली असल्याची सूत्रांची माहिती त्यानंतर अनिल देशमुख यांनी त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे