गृहमंत्री अनिल देशमुख यांची CBI चौकशी करा:: हायकोर्टाचे आदेश

मुंबई | . मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस कुलकर्णी यांच्या खंडपीठात अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या याचिकांवर सुनावणी झाली.मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे.

परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती त्याबरोबरच जयश्री पाटील यांनी देखील गृहमंत्र्यांविरोधात याचिका दाखल केली होती.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं होतं. विरोधकांनीही या प्रकरणात राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यानंतर हे सर्व

मुंबई उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआयला चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देऊन 15 दिवसांमध्ये परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने असं सांगितलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे.