पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, मार्केट ३०एप्रिल पर्यंत बंद :आयुक्त विक्रम कुमार
पुणे : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर पुणे महापालीका आ युक्त विक्रम कुमार यांनी सुधारीत अादेश साेमवारी जारी केले अाहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने ३० एिप्रलपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. असा आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत
शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने हाेत अाहे. राज्यातही काेराेनाचा प्रसार वेगाने हाेत असल्याने रविवारी राज्य सरकारने संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्याचे आदेश काढले हाेते. या अादेशात राज्य सरकारने स्थािनक स्वराज्य संस्थांनाही तेथील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अादेश िदले हाेते. त्यानुसार महापािलका अायुक्त िवक्रम कुमार यांनी साेमवारी रात्री यासंदर्भातील अादेश जारी केले अाहे.
शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळून सर्व प्रकारची दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात यावीत असे या अादेशात नूमद केले आ हे. त्यामुळे अाजपासून महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. दरम्यान हा अादेश येण्यापुर्वीच पुण्यातील सराफांच्या दुकानाबाहेर बंदचे फलक लावण्यात अाले अाहे.महत्वाचे मुद्दे : * जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी राहतील पण सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागले.जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांच्या मालकांनी आणिकामगारांनी त्वरीत लसीकरण करावे ग्राहकांसोबत सामाजिक अंतर बाळगूनच बोलावे दुकान मालक आणि कामगारांनी फेसशिल्डचावापर करावा बंद असलेल्या सर्व दुकान मालकांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या कामगारांचे लसीकरण करावे