ग्रहमंत्रालयाच्या प्रशासकीय कामात हस्तक्षेप करणार नाही :- ग्रहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई:. पोलीस खात्यातील अधिकाऱ्याच्या कोणावर किती निष्ठा आहेत त्या तपासल्या जातील काल उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी जो निर्णय दिला आहे. त्याला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोर्टाने जो आदेशाला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू, असंही ते म्हणाले.सध्याचा काळ चॅलेंजिंग, प्रशासकिय कामात हस्तक्षेप करणार नाही अशी असे ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली

दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले

. मी आजच पदभार स्वीकारला आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचं काम मी करेल. सध्याचा काळ अवघड आणि चॅलेंजिंग आहे. कोरोनामुळे पोलीस फोर्स रस्त्यावर आहेत. फिल्डवर काम करत आहे.  सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग आहे. परंतु, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन, असं सांगतानाच प्रशासकिय कामात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.पोलीस दलाचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आहे. तरीही कोरोनामुळे त्यांना ही ड्युटी करावी लागत आहे

. त्यातच आता एप्रिलमध्ये गुडीपाडवा, रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजानची सुरुवात आदी विविध सण-उत्सव आहेत. प्रत्येक धर्मीयांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी चॅलेंजिंग परिस्थिती असणार आहे, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं.