पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिक्षण मंडळाची खरेदी हि अभ्यास करूनच :अति.आयुक्त विकास ढाकणे

पिंपरी-पिंपरी चिंचवड महानरपालिकेने पुनर्प्रत्येयी आदेशाने शालेय साहित्य खरेदीचा निर्णय हा संपूर्ण अभ्यास करुन नंतरच घेतला असल्याची भुमीका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतली आहे. आयुक्तांच्या या भुमीकेमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दुकानदारी करणार्‍यांचे पित्त खवळले असून त्यांनी आगपाखड करत जंग जंग पछाडण्यास सुरुवात केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकतेच वह्या, दप्तर, प्रयोगवही, अभ्यासपुरक पुस्तके, यैक्षेणिक साहित्य असे सुमारे 3 कोटी 80 लाख रुपयांचे शैक्षेणिक साहित्य पुनर्प्रत्येयी आदेशाने निवदा न काढता थेट पद्धतीने खरेदीचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे या दोघांनीही या सेदर्भात वेळोवेळी ही खरेदी सुपर्ण अभ्यास करुन तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कायदा विभागाचा अभिप्राय घेवून तसेच स्थाया समितीच्या मान्यतेने घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र असे असताना याबाबत ज्यांची दुखती नस दाबली गेली आहे अशी मंडळी विविध दबाव तंत्राचा वापर करु लागली आहेत परंतू या कोणत्याही अबावाला भीक न घालता महापालिका आयुक्त आपल्या भुमीकेवर कणखर राहिले आहेत.गेली तीन वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काही मंडळी महानगरपालिकेत काही मंडळी दबावतंत्राने आपली दुकानदारी थाटून बसली होती. आयुक्तांच्या या भुमीकेने त्यांचे पित्त चांगलेच खवळले आहे

.पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या शाळांमधिल प्राथमिक शाळेतील 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना तर माध्यमिक शाळेतील 2 लाख 29 विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य पुढील शैक्षेणिक वर्षात वाटण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 2016 मध्ये निविदा प्रसिद्ध करुन तीन वर्षांसाठी शालेय साहित्य खरेदीचा करार संबंधित ठेकेदारांबरोबर केला होता. 2019 मध्ये याच ठेकेदारांकडून पुनर्प्रत्येयी आदेशाने साहित्य खरेदीचा निर्णय तत्त्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी घेतला होता. परंतू यावर स्थायी समिती सदस्यांनी हरकत घेतल्याने हा विषय दप्तरी दखल करण्यात आला होता.

परंतू यासंदर्भात संबंधित लोकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने न्यायालयाने यासदर्भात महापालिकेला खडे बोल सुनावले तसेच या संदर्भात काही सुचना दिल्या. या संचनांचे पालन करत तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कायदा विभागाचा अभिप्राय घेत महापालिका प्रशासनाने हा शालेय साहित्य खरेदीचा निर्णय घेतला आहे.यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे संबंधित ठेकेदार हे 2016 च्या आदेशानुसारच ठरलेल्या दराने हे साहित्य खरेदी करणार आहेत गेल्या पांच वर्षात झालेल्या दरवाढीचा विचार करता जवळपास चार कोटी रुपयांची बचत महापालिका करणार आहे.

Latest News