गिरणी कामगार नेते दत्ता ईस्वलकर यांचं बुधवारी सायंकाळी निधन


मुंबई | राष्ट्र सेवा दलात घडलेले दत्ता ईस्वलकर हे सुरुवातीला कापड गिरणीत पियोन होते. पुढे त्यांनी कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी 2 ऑक्टोबर 1989 रोजी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली.या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी संपूर्ण आयुष्यभर गिरणी कामगारांसाठी काम केलं. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि लढ्यांमुळे मुंबईतील 10 बंद पडलेल्या कापड गिरणींमधील कामगारांचा लढा उभा राहिला.गिरणी कामगार नेते दत्ता ईस्वलकर यांचं बुधवारी सायंकाळी निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजाराशी संघर्ष करत असताना मुंबईत जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते म्हणून दत्ता इस्वलकर महाराष्ट्राला परिचित होते.
गेले तीन ते चार वर्षे ते आजारी होते. मंगळवारपासून त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी संध्याकाळी 5.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.