राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होण्याचे ठाकरे सरकारचे संकेत

मुंबई ( प्रतिनिधी )अन्यथा कडक कारवाईअत्यावश्यक सेवेतील भाजीपाला आणि किराणा यांना दिलेली सूट रद्द करता येईल का?राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. गर्दी कमी होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. किराणा तसेच भाजी खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आहे, असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊन आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे.लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत

. आता प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. काही निर्बंध कडक केले जाऊ शकतात. लोकल प्रवासावर निर्बंध घातले जातील. तसेच सर्वसामान्यांनाही पेट्रोल मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच इंधन दिलं जाणार आहे.लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. दोन दिवसात कडक कारवाई केली जाणारसर्वसामान्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही. तहसीलदारांच्या पत्रानुसार केवळ अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार

. याबाबत सरकार विचाराधीनलोकल सेवेचा अत्यावश्यक सेवा वगळून इतरांनी वापर केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणारलोकल सेवा वापरबाबत कडक निर्बंध करावे त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाली आहेतपरप्रांतीय कामगारांना घरी जाण्यासाठी सूट दिली आहे. त्याचा फायदा घेऊन खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक केली जात आहेआणखी एक दिवस जनतेला पुन्हा आम्ही विनंती करतोय.