चंद्रपूर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुर | चंद्रपुर जिल्ह्यासाठी तातडीने रेमिडीसीवर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावं अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि चंद्रपुरचे जिल्हाधिकारी यांना ट्विटवर टॅग करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी तातडीने दोन हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पत्र लिहिलं आहे.चंद्रपूर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाचे हाल होत आहेत. आपण सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिलं होतं. परंतू चंद्रपूर जिल्ह्याला अद्याप इंजेक्शन उपलब्ध झालं नाही. मुंबई नागपूर आणि नाशिक सारख्या जिल्ह्यात इंजेक्शन उपलब्ध केलं आहे. मग चंद्रपूर जिल्ह्यासंदर्भात असा सापत्न व्यवहार का? चंद्रपूरसाठी त्वरित दोन हजार इंजेक्शन उद्या सकाळपर्यंत उपलब्ध करावी, अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे. दरम्यान, पुणे सारख्या शहरात रेमडेसिवीरचा सावळा गोंधळ अजुनही पाहायला मिळत आहे. रूग्णांचे नातेवाईक 10-10 तास इंजेक्शनसाठी रांगेत उभे राहताना दिसत आहेत.