पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नेटकऱ्यांना एक कोडं सोडवायला दिलं


पुणे | अमिताभ गुप्ता यांनी एक कोडं ट्विट केलं आहे. त्या ट्विटच्या मथळ्यात त्यांनी लिहिलंय की, अरूणला त्याच्या राघव नावाच्या मित्राकडे जायचं आहे. राघवला घरात बसून बोर झालं आहे. अरूणला त्याच्या मित्राकडे जाण्यासाठी मदत करा. तुम्हाला जर हे कोडं सुटलं तर नक्की कमेंट करा. चला बघुया तुम्हाला या कोड्यातून काय संदेश मिळतो.या कोड्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
अरुण एकतर रूग्णालयात दाखल होईल किंवा अनावश्यक असल्याने पोलिस त्याला पकडेल. आणि राघवला गाठण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. अरुण घरीच राहिला पाहिजे आणि परिस्थिती सुधारल्याशिवाय अरुणशी अक्षरशः संपर्क साधू शकणार नाही. आणि तोपर्यंत दोघांनीही घरीच राहावं, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. यावर अमिताभ गुप्ता यांनी छान कमेंट असं म्हटलं आहे.
पोलीस म्हटलं की आपल्यासमोर खाकी वर्दी, कडक स्वभाव असं चित्र समोर दिसतं. पण गुन्हेगारीच्या वाढत्या कक्षा लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा आता सोशल मीडियावर देखील अॅक्टिव झाल्या आहेत. अशातच आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोशल मीडियावर नेटकऱ्यांना एक कोडं सोडवायला दिलं आहे.दरम्यान, या कोड्याच्या माध्यमातून अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांना त्यांच्याच तिरकस भाषेत घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.