पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी 10 बेड सुरु करावेत- वसंत मोरे


पुणे | पाच दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 बेड ऑक्सिजन आणि 40 बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो, तर मग पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त 10 बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात 1680 बेड तयार झाले असतं, असं वसंत मोरे यांनी म्हटलंय.पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे पुण्यात बेडची कमतरता जाणवत आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुण्यात एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन बेड असलेलं हॉस्पिटल सुरु केलं आहे
…………पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त 10 बेड सुरु करावेत आणि पुणेकरांचे प्राण वाचवावेत, असं आवाहन वसंत मोरे यांनी केलं आहे.
दरम्यान, याआधी कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गेल्या वर्षी वसंत मोरे यांनीच पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती