मोदींच्या जागी आणखी कोणीतरी असतं, तर त्यांना हिंदू द्रोही ठरवलं असतं: संजय निरुपम

मुंबई | . हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झाली आहेत. शाहीस्नानासाठी लाखो भाविकांची गर्दी हरिद्वारमध्ये उसळली होती.पंतप्रधान मोदींनी कुंभ प्रतिकात्मकच ठेवलं जावं ही विनंती केली ही चांगली गोष्ट आहे. मोदींच्या जागी आणखी कोणीतरी असतं तर त्याला हिंदू द्रोही ठरवलं असतं.या गर्दीतूनच कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे त्यामुळे आता कुंभमेळ्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुंभ प्रतिकात्मकच ठेवलं जावं, अशी विनंती केली. त्यावर आता काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी भाजपवर टीका आहे.

हरिद्वारमध्ये कालपर्यंत 49 लाख लोकांनी स्नान केलं आहे. कोलकातापर्यंत जाणारी ही गंगा आणखी किती कोरोना घेऊन जाणार हे माहित नाही, अशी टीका संजय निरूपम यांनी केली आहे. तर कुंभमेळा तात्काळ थांबवला पाहिजे, अशी विनंती त्यांनी स्वामी अवधेशानंद यांना केली आहे.

निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर कपीलदेव दास यांचं हरिद्वारमधल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं होतं. 65 वर्षाच्या महामंडलेश्वरांचं निधन कोरोनानं झाल्याची माहिती प्रशासनानं दिली होती. हरिद्वारमध्ये शाही स्नानासाठी साधू संतांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी कुंभमेळ्यात कोरोनाचा स्फोट झालेला आहे. निर्वाणी आखाड्याच्या प्रमुखांसह जवळपास 68 साधू संतांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, एकीकडे कोरोना वाढत असताना हरिद्वारमधील कुंभमेळावा भरवण्यास परवानगी कशी काय दिली गेली, अशी टीका सर्व स्तरातून होत आहे. हरिद्वारमधील प्रचंड गर्दी पाहता कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Latest News