पुणे जिल्हयातील 16 ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणा-या वितरकांवर नियंत्रण:डॉ.राजेश देशमुख जिल्हाधिकारी

IMG_20210418_114441-1

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे.त्यातील पोट कलम २ ( अ ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च, २०२० पासून लागु करुन खंड २,३,४ मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली संदर्भिय ३ अन्वये प्रसिध्द केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पुणे जिल्हयातील एकुण 16 ऑक्‍सिजन सिलेंडर रिफीलींग पुरवठा करणा-या वितरकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ऑक्सीजन वाटप करत असताना अन्न औषध प्रशासन विभागाकडून दुजाभाव होत असल्याचा प्रकार समोर आणला. यावर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले असून पुरवठा करणाऱ्या वितरकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहेपुणे जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागात मोठया प्रमाणात कोरोना (कोविड १९) विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे रुग्ण संख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालय कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. सदर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालय या ठिकाणी ऑक्सीजन पुरवठा करण्यासाठी सिलेंडर्स त्याचप्रमाणे सक्शन यंत्रणा व पाईपलाईन करणेत आलेली आहे. कोव्हिड रुग्णांवर वैद्यकीय उपचारा दरम्यान ऑक्सीजन उपलब्ध करुन देणे अत्यंत आवश्यक आहे.

उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांची आपले कार्यक्षेत्रातील ऑक्‍सिजन उत्पादन करणाऱ्या व ऑक्‍सिजन सिलेंडर रिफीलींग करणाऱ्या आस्थापनेच्या ठिकाणी आदेश मिळाल्‍यापासून तात्काळ तपासणी करून सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये माहिती सादर करायची आहे. तदनंतर तपासणी पथकाने प्रत्येक आठवड्याला सदर ठिकाणी अचानक भेट देवून तपासणी करावी व त्याचा अहवाल प्रत्येक आठवडयाच्या गुरुवारच्या आत कार्यालयात सादर करावा.तसेच वरील सर्व ऑक्‍सिजन रिफेलर्सने ते उत्पादित करीत असलेल्या एकुण ऑक्‍सिजन साठ्यापैकी १०% ऑक्‍सिजन साठा हा आपत्‍कालीन वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. सदरचा ऑक्‍सिजन साठा राखीव ठेवला असल्‍याबाबत तपासणी करावी.

संबंधीत अधिकाऱ्यांकडून नियमांचे पालन काटेकोरपणे होते अगर कसे याबाबत देखरेख करणेची गरजेचे आहे. त्याबाबतच्या आवक व जावक नोंदी स्वतंत्र रजिस्टरमध्ये अद्यावत ठेवायच्या आहेत. तसेच ऑक्‍सिजन सिलेंडर रिफीलींग करणार्‍या आस्थापनेमधून ऑक्‍सिजन पुरवठा कोव्हिड १९ रुग्णांवर वैद्यकीय उपचारा करणाऱ्या रुग्णालयांना १००% पुरवठा होत आहे किंवा कसे ? यांची तपासणी करावी तपासणीसाठीचा नमुना तक्ता सोबत जोडला आहे. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० याच्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

डॉ.राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे

Latest News