शिवसेनेच्या आमदारांची जीभ घसरली विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्या वर वक्तव्य…

बुलढाणा :: मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहेसंपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. मात्र मात्र विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोप बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.दरम्यान, संजय गायवाड यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप नेते काय हे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण आता यावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे.. 

केंद्रातील भाजपने राज्य सरकारला मदत करायचं सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला संजय गायकवाडांनी लगावला

.जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं