दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे काय कामाचे? काँग्रेसकडून भन्नाट ट्विट….

मुंबई | क्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत असं उत्तर देण्यात येतं. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?, असं काँग्रेसने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसने केंद्रातील भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे. काँग्रेसने एक फोटो शेअर केला आहे. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांचे फोटो आहेत
.राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा म्हणून राज्य सरकार वारंवार विनंती करत आहे. आता या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरूनही आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरूवात होणार असं दिसतंय.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसतीये. वाढत्या कोरोना रूग्णांमुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारकडं वारंवार ऑक्सिजनसाठी विनंती केली जात आहे. यावरून राज्य विरुद्ध केंद्र सरकार हा संघर्ष चांगलाच तापला आहे.